Archive for the ‘Kolhapur’ Category

Panchratna Bachat Yojana, Kolhapur

Friday, March 11th, 2011

Top of Form

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR.

Shri Pant Balekundri Market, 1st floor, Shahupuri 6th Lane, Kolhapur 416 001 (Maharashtra State)

Phone No.0231-2651327

Fax No.0231-2651327

Email ID – confo-ko-mh@nic.in Website – www.confonet.nic.in

Bottom of Form

Complaint Case No. CC/10/509

1. Revanshidh Shivram Gaikwad Room no-15,Ganganagaar.Ichalkarnji.Tal-Hatkanangale.Kolhapur

….Complainant(s)

Versus

1.   Panchratna Bachat Yojana.Through.Secretary.Bhaubali Bhupal Katte. Neharu Chowk.Nandani.Tal-Shirol.Kolhapur

2.   Bhaubali Bhupal Katte Neharu Chowk, Nandani, Tal-Shirol, Kolhapur.

….Opp.Party(s)

BEFORE: HON. Mr.M.D.Deshmukh, PRESIDENT
HON. Mrs.V.N.Shinde, MEMBER
PRESENT: Adv.P.U.Samdole for the complainant
Adv.V.S.Ingrole for the Opponent No.2

Bottom of Form

निकालपत्र :- (दि.10.03.2011)(द्वारा – श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

(1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला.  सामनेवाला क्र.2 यांनी म्‍हणणे दाखल केले.  सामनेवाला क्र.1 प्रस्‍तुत प्रकरणी हजर झालेले नाहीत.  सुनावणीचेवेळेस, दोन्‍ही बाजूंच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला.

(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,

तक्रारदार व सामनेवाला क्र.2 दे.भ.रत्‍नाप्‍पाण्‍णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना येथे नोकरीस होते.  त्‍यामुळे त्‍यांचा परिचय आहे.  सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 या नांवाने बचत योजना सुरु केली.  सदर योजनेनुसार ठेव म्‍हणून रक्‍कम गुंतविल्‍यास साडेपाच वर्षांनी रक्‍कम दामदुप्‍पटीने परत देतो असे सांगितले.  त्‍यावर सामनेवाला यांचेवर विश्‍वास ठेवून सामनेवाला बचत योजनेमध्‍ये रक्‍कम रुपये 35,000/-, पावती नं.154, व रक्‍कम रुपये 30,000/- पावती नं.155 दि.16.11.2003 रोजी ठेव ठेवली आहे.  सामनेवाला क्र.2 हे सामनेवाला क्र.1 चे सेक्रेटरी असलेने दामदुप्‍पटीने रक्‍कम देणेची जबाबदारी सामनेवाला क्र.2 यांची आहे.  सदर रक्‍कम देणेस कसूर केली असल्‍याने वकिलामार्फत नोटीस पाठविली.  परंतु, सामनेवाला यांनी रक्‍कम दिली नाही.  सबब, मुदतीअंती होणारी रक्‍कम रुपये 1,30,000/- द.सा.द.शे.20 टक्‍के व्‍याजासह, खर्च रुपये 2,500/-, मानसिक त्रासापोटी रुपये 25,000/- देणेबाबत आदेश व्‍हावेत अशी विनंती केली आहे.

(3)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत ठेव पावती क्र.154 व 155, सामनेवाला यांना पाठविलेली दि.16.08.2010 रोजीची नोटीस, सामनेवाला यांची उत्‍तरी नोटीस, सामनेवाला यांच्‍या विरुध्‍द फौजदारी चौकशीचा अहवाल इत्‍यादीच्‍या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे.

(4)        सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे.  ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, सदर सामनेवाला यांनी कधीही बचत योजना चालविली नाही व कधीही स्‍वत:च्‍या नांवे बचत योजना चालविली नाही.  तक्रारदार हे सावकारकीचा व्‍यवसाय करतात.  तक्रारदार यांना कामगार युनियनमधील वादाचा राग धरुन प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.  तक्रारदारांच्‍याकडून कोणतीही रक्‍कम स्विकारुन त्‍यांना पावती लिहून दिलेली नाही.  तक्रारीत उल्‍लेख केलेले अध्‍यक्ष व इतर संचालकांना आवश्‍यक पक्षकार केलेले नाही.  सबब, प्रस्‍तुत तक्रारीस नॉन जॉईन्‍डर ऑफ नेसेसरी पार्टीजची बाध येते.  तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्‍ये ग्राहक हे नाते निर्माण होत नाही.  सबब, तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत यावी व मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- देणेचा आदेश व्‍हावा अशी विनंती केली आहे.

(5)        या मंचाने तक्रारदारांची तक्रार, सामनेवाला यांचे म्‍हणणे व उपलब्‍ध कागदपत्रे यांचे अवलोकन केले आहे.  प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेली ठेव पावती यामध्‍ये ‘पंचरत्‍न बचत योजना’ इतका उल्‍लेख दिसून येतो.  सदरची योजना कोणत्‍याही कायद्याखाली नोंदणी करीत आहे हे दिसून येत नाही.  तसेच, सदर पावतीवरती ठेवीदार व सेक्रेटरी यांची सही आहे.  तसेच, अध्‍यक्ष म्‍हणून उल्‍लेख आहे, परंतु त्‍यावरती नांव किंवा सही नाही.  तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीमध्‍ये सदर बचत योजना कोण चालविते, त्‍याचे अध्‍यक्ष कोण, संचालक कोण आहेत याबाबत काहीही नमूद केलेले नाही.  त्‍यामुळे सदर बचत योजनेचे अध्‍यक्ष-संचालक मंडळ यांना प्रस्‍तुत प्रकरणी आवश्‍यक पक्षकार केले नसल्‍याने प्रस्‍तुत तक्रारीस नॉन जॉईन्‍डर ऑफ नेसेसरी पार्टीजची बाध येते.  हे मंच यापुढे असेही स्‍पष्‍ट करीत आहे, तक्रारदारांनी त्‍यांच्‍या इच्‍छेनुसार सामनेवाला क्र.1 बचत योजनेचे संबंधित असणारे अध्‍यक्ष व संचालक मंडळ यांना आवश्‍यक पक्षकार करुन पुन्‍हा त्‍यांनी त्‍यांची तक्रार दाखल करावी.  सबब आदेश.

आदेश

1.    तक्रारदारांची तक्रार काढून टाकणेत येते.

2.    खर्चाबाबत आदेश नाहीत.

(श्री.एम्.डी.देशमुख)                (सौ.वर्षा एन्. शिंदे)

अध्‍यक्ष                          सदस्‍या

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, कोल्‍हापूर.

कोल्‍हापूर, दि.10.03.2011.